पनवेल: भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत अभिवादन
Panvel, Raigad | Oct 15, 2025 मिसाईल मॅन म्हणून जगभरात ख्याती असलेले थोर शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड, उद्यान विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी अभय जाधव, प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वरुपा परळीकर, मालमत्ता विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका महापूरकर, प्रशासकीय अधिकारी रवी जाधव आणि इतर अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.