अमरावती: रुपये- 20 लक्ष निधीतून आमदार - सौ. सुलभाताई खोडकेंनी अंबापेठ - गौरक्षण प्रभागवासीयांची विकासकामांची केली स्वप्नपूर्ती
रुपये - 20 लक्ष निधीतून अंबापेठ - गौरक्षण प्रभागात पेव्हिंग ब्लॉक बसविणे व नालीचे बांधकाम करणे या विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. सर्वप्रथम आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक - 13 अंबापेठ येथील शिलांगण मार्ग स्थित प्रभात कॉलनी येथील मनपाच्या खुल्या जागेवर पेव्हिंग ब्लॉक लावणे यासोबतच देशपांडे वाडी येथील नालीचे बांधकाम करणे या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.