यवतमाळ ( दिघी) - यवतमाळ तालुक्यातील दिघी इथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या रागातून युवकाने महिलेवर लोखंडी पट्ट्याने वार केले यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बाभुळगांव पोलीस ठाण्यात युवकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महानंदा चांदेकर असे मृत महिलेचे नाव आहे तर तिच्या शेजारीच राहणारा युवक पूर्वेज पारधी असे आरोपीचे नाव आहे.