जालना: धर्मवीर संभाजीराजेंसह सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणार-वंदना मगरे
Jalna, Jalna | May 14, 2026 छत्रपती संभाजी महाराजांच्या नावातच 'धर्मवीर' आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संभाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यांच्या विचारांनी चालल्यास आपले जीवन नक्कीच अलौकिक होईल. जालना महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यात येऊन शहराच्या सौंदर्यकरणात भर घालण्यात येईल, असे प्रतिपादन महापौर वंदना मगरे यांनी येथे केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्यावतीने जालना शहरातील छत्रपती संभाजी राजे