जालना: गुटखा माफिया सतीश लाला जैस्वाल यांना तात्काळ अटक करा ; आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष सुभाष बोर्डे यांची मागणी
Jalna, Jalna | Apr 30, 2026 जालना शहरातील चंदनझिरा परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश लाला जैस्वाल यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून जालना शहराकडे येणारी संशयित गाडी पत्रकार संतोष भुतेकर यांच्या निदर्शनास आली. संबंधित वाहनाचा चालक भरधाव आणि वाकडी-तिकडी गाडी चालवत असल्याने संतोष भ