शिरोळ: प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची कुंभोज उपोषण स्थळी भेट, लवकरच योग्य निर्णय घेण्याचे दिले आश्वासन, देवमोरे उपोषणावर ठाम
कुंभोज येथील सुरू असलेल्या बाजारपेठेतील जागेच्या वादासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाला इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि उपोषणकर्त्यांशी संवाद साधला.शिंदे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजून घेत त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल,असे ठाम आश्वासन दिले.