धर्माबाद: सिरसखोड पूल पाण्याखाली गेल्याने धर्माबाद तालुक्याचा संगम मनूर विळेगाव बामणी गावांशी संपर्क तुटला
धर्माबाद तालुक्यातील शिरसखोड पुन्हा आज दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली होती सकाळी 10 पर्यंत तर पुलावरून जवळपास 2 फूट पाणी वाहत होते. जेव्हा केव्हा धर्माबादच्या वरील भागात अतिवृष्टी होते तेव्हा तेव्हा हा गोदावरी नदीवरील पूल पाण्याखाली जातो. हा पूल पाण्याखाली गेल्याने धर्माबादचा बामणी मनूर विळेगाव संगम आदि गावांचा थेट संपर्क तुटला आहे. यामुळे वरील गावातील नागरिकांना इतर मार्गाचा अवलंब करत धर्माबाद येथे जेणे जाणे करावे लागणार आहे.