सातारा: साताऱ्यात नमो युवा रन 2025 ला जबरदस्त प्रतिसाद –2 हजाराहून अधिक स्पर्धकांची हजेरी
Satara, Satara | Sep 21, 2025 आज साताऱ्याच्या भूमीत एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या सेवा सप्ताहाचा भाग म्हणून साताऱ्यातील नमो युवा रन 2025 ला तरुणाईनं जबरदस्त प्रतिसाद दिलाय.तब्बल दोन हजारांहून अधिक धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. 'रन फॉर नशा मुक्त भारत' या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम समाजात एकतेचा, आरोग्याचा आणि नशामुक्तीचा संदेश देणारा ठरला.