भोकरदन: दिवाणी न्यायालयात वाद सुरू असताना सासऱ्याने विकली जमीन -सीमा मगरे, गोरक्षनाथ मगरे यांनी राजुर येथे माहिती देत केला आरोप
आज दि.23 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरदन ता.तीर्थक्षेत्र राजुर येथे सीमा गोरक्षनाथ मगरे यांनी त्यांच्या सासऱ्यावर आरोप केला आहे की,त्यांचे सासरे बाबुराव मगरे यांनी 2महिन्यापूर्वी त्यांची त्यांचे पती गोरक्षनाथ बाबुराव मगरे यांची वडिलोपार्जित जमीन 3 कोटी रुपयांमध्ये परस्पर विकली आहे,यात दिवाणी न्यायालयात दावा सुरू असताना जमीन विकली असून खरेदी रद्द करावी अशी मागणी गोरक्षनाथ मगरे व सीमा मगरे या पती-पत्नीने प्रशासनाकडे केली आहे.