मोटारसायकलवरून जात असताना दोन कुत्रे चाकाला धडकल्याने ६२ वर्षीय कुसुम खुसराम मिरासे (रा. एकलारी) या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना मौजा परमात्मा एक भवन मोहाडी समोर येथे घडली. मृतक महिला आपल्या मुलासोबत दुचाकी क्रमांक MH 36 AE 2147 वर डबलसीट बसून जात असताना, भांडण करणारे दोन कुत्रे अचानक मोटारसायकलच्या मागील चाकावर आदळले. या धडकेमुळे मागे बसलेल्या कुसुम मिरासे रोडवर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय मोहाडी, त्यानंतर सा.रु. भंडारा येथे उपचार