श्रीवर्धन: श्रीवर्धनमध्ये डंपरच्या व्यवहारावरून वादातून मारहाण..@raigadnews24
श्रीवर्धन एस.टी. स्टॅण्डसमोर डंपरच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून एक व्यक्ती व त्याच्या तीन सहकाऱ्यांवर पाच जणांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड व केबलने हल्ला केल्याची घटना घडली आहे . फिर्यादीची कार रस्त्यात अडवून त्याला बाहेर ओढून मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ व दमदाटीही करण्यात आली.