नागपूर ग्रामीण: मंगळवारी बाजारात ज्वेलर्ससह चार दुकाने फोडली; ४२ लाखांचा ऐवज लंपास
आय.सी. चौक, मंगळवारी बाजार परिसरात गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका ज्वेलर्ससह चार दुकाने फोडली. यात सुमारे ४२ लाख रुपयांचेदागिने आणि रोकड लंपास करण्यात आली आहे.मनोज शहा यांचे 'मोनाली ज्वेलर्स' व 'मोनाली स्टील' आणि इतर दोन किराणा दुकाने आरोपीनी फोडली.चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. ज्वेलर्सच्या दुकानातून ४.५ लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४२ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला.