हिंगोली पतंजली योग पिठाचे आधुनिक धनवंतरी आचार्य बालकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त हिंगोली जिल्हा पतंजली योग समिती मार्फत वृक्ष मित्र व हरित शाळा पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये पाच संस्थांसह वीस वृक्षमित्र तर दहा शाळा हरित शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले . या पुरस्कारांचे वितरण संत निरंकारी भवन हिंगोली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.