पोलीस रेझिंग डे, सायबर गुन्हे प्रतिबंध आणि 'ऑपरेशन थंडर' निमित्त नवीन कामठी पोलीस स्टेशनद्वारे शहरात भव्य जनजागृती रॅली व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात परिसरातील विविध शाळांमधील १०० ते १२० विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील कामकाज, विविध शाखा, शस्त्रास्त्रे आणि फॉरेन्सिक व्हॅनच्या कार्याची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.