अकोट: नगरपालिका निवडणुकीत 82 हजार 325 मतदार बजावणार मतदानाचा हक्क; उपविभागीय अधिकारी यांची पत्रकार परिषदेत माहिती
Akot, Akola | Nov 8, 2025 अकोट नगरपालिकेसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होत आहे तर अकोट नगर पालिकेच्या एकूण 35 नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी पालिका हद्दीतील एकूण 82 हजार 325 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली एकूण 90 मतदान केंद्रांवरून हे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर निवडणूक कार्यक्रम संबंधित विविध बाबींबाबत सखोल माहिती उपविभागीय अधिकारी लोणारकर यांच्या द्वारा देण्यात आली आहे.