जालना: एसी रूममधून प्रशासन; शहरात मात्र मनमानी?
झू चौपाटीतील मोरावर युवकांचा डान्स, व्हिडिओ व्हायरल; आयुक्त अंजली शर्मा यांच्या
Jalna, Jalna | May 4, 2026 शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळील झू चौपाटी परिसरात बांधण्यात आलेल्या आकर्षक मोराच्या संरचनेवर काही युवकांनी चढून डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे १ मे रोजी पालकमंत्री Pankaja Munde यांच्या हस्ते या परिसराचे उद्घाटन करण्यात आले होते. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या ठिकाणी अशा