जालना: जालना महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा यांनी घेतली आमदार अर्जुनराव खोतकर यांची भेट*
Jalna, Jalna | May 12, 2026 जालना : जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान शहरातील विविध नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन प्रभावीपणे काम करावे, असा सल्ला आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आयुक्त अंजली शर्मा यांना दिला. शहरातील वाढते अतिक्रमण, घाणीचे साम्राज्य, मोकाट कुत्र्यांचा त्रास तसेच स्वच्छतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार खोत