हवेली: वाघोली परिसरात रक्तदान शिबीर संपन्न
Haveli, Pune | Nov 2, 2025 वाघोली बकोरी रोड येथील राधेश्वरी नगरी अल्लुरे सोसायटी येथे रविवारी (दि.२) रक्तदान शिबीर संपन्न झाले. वाघोली रक्त केंद्र रक्तपेढी यांच्या मदतीने पार पडलेल्या रक्तदान शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. राष्ट्रीय मराठा पार्टी आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.