मानगाव: माणगाव पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात अपघात
अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू
कारवर डोंगरातून दगड कोसळून अपघात
Mangaon, Raigad | Oct 30, 2025 माणगाव पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. स्नेहल गुजराती असे या महिलेचे नाव आहे. ताम्हिणी घाटात कोंडेथर गावाजजवळची ही घटना आहे. ही महिला ज्या कारमधून प्रवास करत होती त्या कारवर डोंगरातून भलामोठा दगड कोसळला. आणि कारचे सनरूफ तोडून गाडीत बसलेल्या महिलेवर पडला. यात गंभीर जखमी झाल्याने स्नेहल यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने कारमधील इतर प्रवासी सुखरूप असून त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही.