गोपुरी चौक ते साटोडा रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून रखडलेले असल्याने अलोडी परिसरातील ग्रामस्थांचा संयम अखेर संपला आहे. धुळीमुळे आरोग्याच्या समस्या, अर्धवट रस्त्यामुळे अपघातांचा धोका आणि वाहतुकीची मोठी गैरसोय होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या निषेधार्थ आज दिनांक 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ग्रामस्थांनी एकत्र येत मेणबत्त्या लावून मौन पाळत प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहिली. येत्या तीन दिवसां