नागपूर ग्रामीण: नागपूर ग्रामीणमध्ये पल्स पोलिओ मोहीम यशस्वी
राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त नागपूर ग्रामीण तालुक्यात रविवारी पल्स पोलिओ मोहीम उत्साहात पार पडली. याद्वारे शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आले. मोहिमेच्या तयारीसाठी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते, तसेच तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली होती.