राजूरा: राजुरा येथे धनोजे कुणबी समाज मंडळाच्या वतीने धनोजे कुणबी सभागृहात कोजागिरी पौर्णिमा उत्सव व रक्तदान शिबिर
धनोजे कुणबी समाज मंडळाच्या वतीने आज दि 16 ऑक्टोबर 7 वाजता राजुरा येथे धनोजे कुणबी सभागृहात कोजागिरी पौर्णिमा उत्सव व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी खा. प्रतिभा धानोरकर उपस्थित राहून सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले. तसेच स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य सभागृह इमारतीचे खा. प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी लोकार्पण केले.