शहापूर: रेल्वे पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाशिंद रेल्वे स्टेशनवर वयोवृद्ध व्यक्तीचे वाचले प्राण, थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
वाशिंद रेल्वे स्थानकात एक ज्येष्ठ व्यक्ती सीएसएमटी लोकलमध्ये चढत असताना त्यांचे दोन्ही पाय घसरले आणि ते मधल्या दांड्याला धरून काही अंतर घसरत गेले त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाठीमागच्या डब्यात असलेले जीआरपी किशोर परटोले यांनी मागील डब्यातून उतरून धावत पुढे जाऊन त्या व्यक्तींचे प्राण वाचवले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून हा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच रेल्वे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.