खटाव: खटाव तालुक्यात पुसेगाव नजीकच्या कटगुण गावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; आरोपी गजाआड
Khatav, Satara | Oct 11, 2025 खटाव तालुक्यातील कटगुण येथे शनिवारी सायंकाळी पाच च्या सुमारास पूर्ववैमनस्यातून बबलू मनोहर जावळे (वय ४०) रा. कटगुण याचा खून करण्यात आला.पुसेगाव पोलिसांनी संशयित आरोपी दीपक वामन जावळे याला तातडीने ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी रात्री उशिरा नऊ वाजता दिली. कटगुण गावाच्या पूर्वेस धारपुडी रोडवरील म्हारकी शिवारात खुनाची घटना घडली. बबलू जावळे आणि दीपक जावळे यांच्यामध्ये काही दिवसांपासून पूर्ववैमनस्य होते. शनिवारी पुन्हा एकदा वाद वाढल्याने ही घटना घडली.