अकोला: पोलीस लॉन येथे अकोला पोलीस दलाची दिवाळी भेट : 1.30 कोटींचा मुद्देमाल परत
Akola, Akola | Oct 16, 2025 अकोला पोलीस दलाने दिवाळीनिमित्त 1 कोटी 30 लाख पेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल व मोबाईल संबंधित फिर्यादींना परत करत एक आगळीवेगळी भेट दिली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात राणी महल, पोलीस लॉन, येथे दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मोबाईल, सोने, वाहने इत्यादी वस्तू कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुपूर्द करण्यात आल्या. तसेच विभागीय "उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा"त निवड झालेल्या मंडळांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले. या उपक्रमामुळे