जालना: जालन्यात 24 तास वीज खंडित; यंत्रणेच्या हलगर्जीपणावर आमदार बबनराव लोणीकरांचा संताप
Jalna, Jalna | Apr 26, 2026 जालना एमआयडीसीतील 220 केव्ही लाईनमधून मोतीबाग 33 केव्ही फीडरकडे जाणारा वीजपुरवठा तारा तुटल्यामुळे खंडित झाल्याने जालना शहरातील अनेक भाग मागील 24 तासांपासून अंधारात आहेत. या प्रकारामुळे शहरातील दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रविवार दि. 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी वीज वितरण विभाग आणि कंत्राटदारांच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.