सेनगाव: क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश, शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाई व रब्बी हंगामासाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत पडण्यास सुरुवात झाली आहे. अतिवृष्टी अनुदान व रब्बी हंगामासाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत मिळत नसल्याने काल सेनगांव तहसील कार्यालयामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला होता अखेर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आले असुन शेतकऱ्यांना मदत मिळणे सुरू झाले आहे.