कामठी: खैरी गावाजवळ चारचाकीच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी, हाताचे व कमरेचे हाड झाले फॅक्चर
Kamptee, Nagpur | Oct 17, 2025 12 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास टाइल्स फिटिंग चे काम करणारे दीपक गुप्ता हे काही कामानिमित्त त्यांच्या दुचाकीने कन्हान येथे जात असताना खैरी गावाजवळ चार चाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ज्यात दुचाकी चालक दीपक हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता आशा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या हाताचे व कमरेचे हाड फॅक्चर झाले आहे.