पनवेल: १ डिसेंबर रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन
Panvel, Raigad | Nov 3, 2025 महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने आज दि. 3 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात प्राप्त एका अर्जावर सुनावणी घेऊन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिक्रमण विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले. या पुढील माहे डिसेंबर महिन्याचा लोकशाही दिन दि. १ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज निवेदनाच्या दोन प्रतींमध्ये दि. १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे 'लोकशाही दिनाकरीता अर्ज' असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.