धामणगाव रेल्वे: डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वपक्षीयांकडून निषेध
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना गंभीर असून, या घटनेचा सर्वपक्षीयांकडून धामणगाव शहरातील नगरपरिषद येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमुखाने या हल्ल्याला लोकशाहीवरचा आघात म्हटले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाटा गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिवसेना शिंदे गट वंचित बहुजन आघाडी सह संविधान प्रेमी तसेच इतर पक्षांच्या नेत्यांनी न्यायव्यवस्थेचा सन्मान