वर्धा: जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राटदारांचे देयके तात्काळ द्या – खा.अमर काळे यांचा पत्राला प्रशासनाचे सकारात्मक उत्तर
Wardha, Wardha | Sep 14, 2025 अमर काळे यांनी जलजीवन मिशनच्या देयकाबाबत राज्य हिश्श्याद्वारे देयके दिली जाण्याबाबत तसेच केंद्र शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करण्याबाबतही पत्राद्वारे विनंती केली. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून देयकांबाबत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचा प्रतिसाद मिळाला आहे. खासदार काळे यांनी देयके न दिल्यास कंत्राटदारांसह आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.ही माहिती दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास खासदार अमर काळे यांच्या कार्यालतून प्राप्त झाली आहे.