ठाणे: ठाण्यातील लोकमान्य नगर येथील पंचशील विद्यालयाजवळ दिवाळीनिमित बांधलेल्या किल्ल्याची तोडफोड
Thane, Thane | Oct 21, 2025 ठाण्यातील लोकमान्य नगर येथील पंचशील विद्यालयाजवळ दिवाळीनिमित्त लहान मुलांनी बांधलेला किल्ला तोडलेला पहायला मिळाला आहे. यावर स्थानिक नागरिकांनी आज दिनांक 21ऑक्टोबर रोजी दुपारी 12च्या सुमारास स्थानिकांनी माहिती दिली असून संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार दोन ते तीन वेळा या मुलांनी बांधलेला किल्ला तोडण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून स्थानिक नागरिक स्वतः जागरण करणार आहेत.