लाकडी पलंगावरून झालेल्या किरकोळ घरगुती वादातून 67 वर्षीय वृद्धाला त्यांच्याच मुलाने आणि सुनेने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील मिन्सी येथे घडली आहे. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी रामदास बकाराम केझरकर (वय 67 वर्षे, रा. मिन्सी) आणि आरोपी मुलगा दिनेश रामदास केझरकर (वय 32 वर्षे) व आरोपी सून वय 28 वर्षे) हे एकाच घरात वेगवेगळे राहतात. दिनांक 19 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान रामदास केझरकर हे आपल्या घरातील छपरीत पलंगावर