भद्रावती: अज्ञात चोरट्याने हॉटेलातील ग्राहकाचे चार लाख पळविले.
स्टेट बँकेजवळील घटना.
हाटेलात नाश्ता केल्यानंतर चार लाख रुपये असलेली बैग टेबलावर ठेऊन हात धुण्यासाठी गेलेल्या बरांज येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आशीष यशवंतराव काळे यांची चार लाख रुपयाची बैग अज्ञात चोरट्याने पळवली. सदर घटना शहरातील स्टेट बँक इंडिया जवळील एका हाटेलात दिनांक १५ रोज सोमवारला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीसात करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.