भद्रावती: मुधोली स्वास्थ्य केंद्रात आरोग्यसेवेचा बोजवारा.
शिवसेनेचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन.
तालुक्यातील मुधोली येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात ऊपचारासाठी गेलेल्या नागरीकांना ऊपचारासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दवाखान्याच्या वेळेत अनेकदा डाक्टर, नर्स तथा इंचार्ज ऊपस्थीत नसतात.त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. या प्रकाराची चौकशी करून येथील रुग्णसेवा सुरळीत करावी यासाठी शिवसेनेतर्फे ऊपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम यांच्या नेतृत्वात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.