गंगापूर (प्रतिनिधी): मंगळवारी दि. २३ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गंगापूर–वैजापूर रोडवरील वाडगाव पाटी जवळ, शिवपार्वती लॉन्स नजीक दूधाच्या टँकर आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे.