गडचिरोली: गडचिरोलीकरांसाठी आनंदाची बातमी... आता गडचिरोलीत आर.ओ.पी. स्क्रिनिंग व उपचारांची सुरुवात
आज जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे रेठीनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी (ROP) स्क्रिनिंग व प्रतिबंध उपचार या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम माधव नेत्रालय, नागपूर यांच्या सहकार्याने सुरू झाला आहे.आता गडचिरोली जिल्ह्यातील बालकांसाठी हा उपचार नागपूरला न जाता स्थानिक पातळीवरच व पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध होणार आहे.