आष्टी: महापुरामुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई मिळणार, आमदार सुरेश धस यांचे आष्टी येथून नागरिकांना आवाहन
Ashti, Beed | Sep 17, 2025 या पार्श्वभूमीवर काही नागरिकांमध्ये "पंचनामे होतील का?" किंवा "नुकसान भरपाई मिळेल का?" अशा शंका व प्रश्न उपस्थित होत आहेत. मी सर्व मतदारसंघातील नागरिक बंधू-भगिनींना मनःपूर्वक सांगतो की महापुरामुळे जे नुकसान झाले आहे, त्यासाठी १००% मोबदला दिला जाईल, कुणाचेही नुकसान दुर्लक्षित राहणार नाही. नागरिकांनी थोडासा संयम ठेवावा आणि धीर धरावा. प्रशासन अधिकारी किंवा माझ्या कार्यालयाशी आपण टेक्स्ट मेसेजद्वारे संपर्कात राहू शकता.