नागपूर ग्रामीण: पाण्यात विजेचा प्रवाह सोडणाऱ्या व्यक्तीचाच करंट लागून मृत्यू, नंदिरा तलावाच्या नाल्यात घडली घटना
मासेमारीसाठी पाण्यात विजेचा प्रवाह सोडणाऱ्या व्यक्तीचाच पाण्यात विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नंदिरातलावाच्या नाल्यात घडली. मृतकाचे नाव सदाशिव मडावी असे सांगण्यात आले आहे. सदाशिव हे दुपारच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी पाण्यात विजेची प्रवाही ताड सोडून मासे मारण्याचा प्रयत्न करत होते. मात्र नाल्याच्या काठावर त्यालाच विजेचा शॉक लागला.