पाथ्री: शिक्षक नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर का टाकला म्हणत एकास मारहाण पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
फिर्यादी रामेश्वर वाळके यांनी पाथरी पोलीसात तक्रार दिली आहे की जैतापूरवाडी येथील शाळेत शिक्षक नसल्याने त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवून व्हॉट्स अॅपवर टाकला होता. फिर्यादी हे दुचाकीने जात असताना चार जणांनी संगणमत करत शिक्षक नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर का टाकला म्हणत फिर्यादी यांना मारहाण करण्यात आल्याची घटना २४ ऑक्टोबर रोजी पाथरीतील जैतापुरवाडी येथे घडली. या प्रकरणी रामेश्वर वाळके यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीसात गुन्हा दाखल.