जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रामदेव बाबा सॉलवंट (RBS) कंपनीच्या डिस्टिलेशन प्लांटला आज दि .19 नोव्हेंबर ला 4 वाजता अचानक भीषण आग लागली. कंपनी परिसरात सुमारे 1.25 लाख लिटर इथेनॉलचा साठा असल्याने आग वेगाने पसरत राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, आग लागलेल्या ठिकाणी सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.