अकोला तालुक्याच्या सिसा, ऊदेगाव, डोंगरगाव आणि बोंदरखेड परिसरात जंगली डुकरांचा उपद्रव तीव्र झाला असून तब्बल दहा ते बारा एकरांतील हरभरा पिकाचा नाश झाला आहे. यादरम्यान, रब्बी हंगामातील इतरही पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तर दुसरीकडे गावाभोवती कळपाच्या कळप जंगली डुक्कर फिरू लागल्याने शेतकरी रात्रंदिवस पहारा देत आहेत, तरीही हानी कमी होत नाही. वाढत्या नुकसानीमुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून पिकांचे संरक्षण करावे, अशी तीव्र मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे