नागपूर महानगरपालिका आणि लोकमत माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरचंद पार्क येथे उभारण्यात आलेल्या २०० फूट उंच भव्य राष्ट्रध्वजाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात अनावरण करण्यात आले. नागपूरच्या वैभवात भर घालणारा हा तिरंगा आता शहराच्या क्षितिजावर दिमाखात फडकणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला नागपूरच्या महापौर श्रीमती निता ठाकरे, लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.