परभणी: थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र करण्याचा राज्यशासनाचा निर्धार : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्त विकार आहे, मात्र योग्य उपचाराने हा आजार नक्की बरा होतो. आपले महाराष्ट्र राज्य थॅलेसेमिया मुक्त करण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे, त्यादृष्टीने रुग्णांना औषधोपचार सहज व सुलभपणे मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. परभणी शहरातील बी. रघुनाथ हॉल येथे दोन दिवसीय “एक पाऊल थॅलेसेमीया मुक्तीकडे” या अभियान राबविण्यात आल