मोताळा: बोराखेडी येथे अल्पवयीन मुलीचे लग्न लावून गर्भवती केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बोराखेडी येथील मंदिरात 2024 मध्ये अल्पवयीन मुलीचे लग्न आनंद दिलीप गायकवाड याच्याशी करण्यात आले होते. यावेळी दिलीप आसाराम गायकवाड, अलका दिलीप गायकवाड, शालूबाई विनोद सोनवणे आणि सुखलाल युवराज मोरे यांच्यासह दोन्ही कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. 13 सप्टेंबर रोजी तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर अलका गायकवाड यांनी तिला बुलढाणा येथील स्त्रीरुग्णालयात दाखल केले.