मुरुड: शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या वर आमदार पत्नी शिवसेना नेत्या मानसी दळवी यांचा हल्ला
Murud, Raigad | Aug 20, 2025 मागील चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मुरुड तालुक्यातील मिठेखार येथे दरड कोसळल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या दोन महिला नेत्यांमध्ये काल चांगलीच जुंपली. शेकापचे सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यात हा वाद झाला. आज हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.