साकोली: अखिल विश्व गायत्री परिवार साकोलीतर्फे सेंदूरवाफा येथे गायत्री प्रज्ञा पिठ येथे चोवीस कुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन
अखिल विश्व गायत्री परिवार साकोलीतर्फे सेंदूरवाफा येथील श्रीनगर कॉलनीतील गायत्री प्रज्ञा पिठ येथे तीन दिवसीय 24 कुंडीय गायत्री महायज्ञाचे व संस्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.30 नोव्हेंबर,एक व दोन डिसेंबर असे तीन दिवस हा समारोह चालणार आहे रविवार दि.30 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजतागणेश वार्ड साकोली ते श्रीनगर कॉलनीपर्यंत अखंड दीप कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते विविध संस्कार तसेच ध्यान साधना महायज्ञ तसेच जागरण दिपयज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे