उत्तर सोलापूर: शिरापूर सो येथील पांदण रस्त्यावर मुरूम टाकण्याची परवानगी द्यावी: सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांची मागणी...
मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो येथील पांदण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शेतकरी रोज दिड किलोमीटर चिखलातून ये जा करतो. त्या रस्त्यावर मुरूम टाकण्याची शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी शनिवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना केली आहे.