गडचिरोली: महसूल सप्ताह १ ते ७ ऑगस्ट दरम्यान साजरा होणार: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली, ३१ जुलै: १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिना’पासून ‘महसूल सप्ताह-२०२५’चे आयोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल यंत्रणेला लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून सप्ताह राबवण्याचे निर्देश दिले आहेत. दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महसूल विभागातील सर्व अधिकारी सहभागी होते. महसूल विभागाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आणि जनजागृती व