बागलाण: बागलाण तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू...
Baglan, Nashik | Oct 19, 2025 बागलाण तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू... बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काल दिनांक 18 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास पहिली घटना एकलहरे परिसरात घडली. निंबा गरबड अहिरे यांच्या शेतातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला.